*’जीवनगाथा बहिणाबाईंची’*
*१९ एप्रिल रोजी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावरील नि:शुल्क रंगमंचीय आविष्कार*
पिंपरी (दिनांक : १७ एप्रिल २०२५)
लेवा पाटीदार मित्रमंडळ, सांगवी आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘जीवनगाथा बहिणाबाईंची’ हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. मनोरंजनातून संस्कृतीकडे नेणारा हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ४.४५ वाजता निळू फुले प्रेक्षागृह, सांगवी येथे होणार आहे.
स्वर्गीय प्राध्यापिका कमल पाटील यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होत आहे. बहिणाबाईंच्या जीवनावर उद्योगनगरीत दहा वर्षांनी प्रयोग होत आहे, असे प्रसिद्धी प्रमुख पंकज पाटील यांनी कळवले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन चिंचवड विधानसभा आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे आहेत. पिंपरी – चिंचवड महापालिका माजी सभागृह नेता नामदेव ढाके यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील.
सांस्कृतिक परंपरा, सणवार, जुन्या काळातील गावकऱ्यांचे जीवनदर्शन यांचा या कलाकृतीत समावेश आहे. खानदेशातील लोकांचे राहणीमान, संस्कृती यांचे यथार्थ वर्णन बहिणाबाईंच्या काव्यात, ओवीत, म्हणींमध्ये आले आहे. त्यांनी केलेले काव्य हे अजरामर आहे. त्यांनीच रचलेल्या काही गीतांना स्वरचित पारंपरिक पद्धतीच्या चाली लावून त्या गीतांवर दृश्य साकारण्यात आली आहेत. हेच काव्य रंगमंचीय आविष्कारातून मूर्त स्वरूपात साकारत असून प्रेक्षकांना त्याचा आस्वाद घेता येईल. प्रवेश निःशुल्क असून प्रथम येईल त्यास प्राधान्य आहे.
भुसावळ येथील सांस्कृतिक कलानिकेतनमधील ५० कलाकारांचा यामध्ये सहभाग आहे. कार्यक्रमाचे लेखन प्रा. कमल पाटील यांनी केले आहे. बहिणाबाईंची भूमिका नेहा खपली वढवेकर साकारत आहे. मुकेश खपली यांची संकल्पना व दिग्दर्शन तर शंभू गोडबोले यांचे संगीत आहे. शेतकरी, त्यांचे घर, त्यांची जिद्द, त्यांचे काबाडकष्ट या सगळ्या सादरीकरणातून प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. सरस्वतीवंदन, पोवाडा आणि त्यानंतर संस्कृतीदर्शन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असेल. संगीत आणि नाट्य स्वरूपात उलगडणारे बहिणाबाईंचे काव्य शहरवासीयांसाठी अविस्मरणीय कलाकृती ठरेल.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

