*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विवेकानंद मराठे लिखित अप्रतिम मालवणी काव्यरचना*
*तुझ्याथंय इलय पळान*
बापाशीचो आधार सुटलो
आवशीक घोरच लागलो
भावाशिचा नेमी धुमशान
आधाराक आसय हुनान
तुझ्याथंय इलय पळान
आवाटात नाकच कापला
कोणी रे आमच्यात बोलला
ज्ञान तुमच्या मुंमईतला
कसा वाया जाताला हुनान
तुझ्याथंय इलय पळान
चारबुकां मीयां शिकलय
ज्ञानामृत बराच पिलय
श्रावणात उपास केलंय
पावणाई पावली हुनान
तुझ्याथंय इलय पळान
© विवेकानंद यशवंत मराठे
शास्त्रीनगर, गोरेगाव ( पश्चिम ).