You are currently viewing मांगेली ते कनार्टक सडा रस्ता डांबरीकरण करावा – वासुदेव वर्णेकर

मांगेली ते कनार्टक सडा रस्ता डांबरीकरण करावा – वासुदेव वर्णेकर

मांगेली ते कनार्टक सडा रस्ता डांबरीकरण करावा-वासुदेव वर्णेकर

दोडामार्ग

मांगेली ते कनार्टक सडा रस्ता डांबरीकरण करावा अशी दोडामार्ग तालुका विकास मंडळ,मुंबई या मंडळाचे कार्याध्यक्ष वासुदेव लक्ष्मण वर्णेकर यांनी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग दोडामार्ग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.मांगेली ते कनार्टक सडा रस्ता डांबरीकरण करावा याबाबत वारंवार लोकांची मागणी होत आहे.हा रस्ता डांबरीकरण झाला तर बेळगांव जवळ आहे.तसेच जो ताण सध्या रामघाट रस्त्यावर पडत आहे तो ताण कमी होईल.बाहेरील राज्यातील वाहने गोवा येथे जाण्यासाठी रामघाट मार्गाने येतात.पावसाळ्यात तर हा रस्ता आणखीनच धोकादायक बनतो.

मांगेली ते कर्नाटक सडा हा रस्ता झाला तर जवळचा रस्ता होईल व रामघाट रस्त्यावर ताण कमी होईल.तरी वरील रस्ता होण्याबाबत आपल्या कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही व्हावी अशी दोडामार्ग तालुका विकास मंडळ,मुंबई या मंडळाचे कार्याध्यक्ष वासुदेव लक्ष्मण वर्णेकर यांनी कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम, सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा