*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*****************************
टक्कल पडते डोक्यावर
नोकरी लागते तेव्हा
वय वाढल्यावर प्रश्न पडतो
लग्न होईल केंव्हा
जेमतेम पगारावर
काहीच भागत नसते
स्थिरस्थावर होईपर्यंत
आईवडिलांची मदत असते
होईल सर्व चांगलं
दोनाचे च्यार झाल्यावर
घराला घरपण मिळेल
बायको घरी आल्यावर
मग काटकसर करून तो
लग्नाचं गणित जुळवतो
सुखासुखी जगण्यासाठी
राबराब राबतो
पगार असतो कमी
म्हणून योग जमून येतं नाही
पन्नास प्रश्न विचारतात मुलाला
तरी होकार कोणी देतं नाही
काय काय आहे नावावर
मुलीचा बाप इथपर्यंत विचारतो
त्यांच्याकडे काहीच नसतं
हे मात्र तो विसरतो
किती पगार तुम्हाला
अस्स मुलगी मुलाला विचारते
ती ही अर्ध्या वयाची असते
तरी म्हणे विचार करून सांगते
सर्व सुखसोयीयुक्त नवरा असावा
असा तिचा हट्ट असतो
मग धुमधडाक्यात लग्न लावायला
मुलीचा बापही मागेपुढे पहात नसतो
मोठ्ठा पगार मिळेपर्यंत
निम्मे वय झालेले असते
स्थिरस्थावर होईपर्यंत
कोणाचेही लग्न होतं नसते
सर्वकाही चांगल असते हो
पण कोणीच जमवून घेत नाही
अवाजवी अपेक्षा करतांना
आपलं फाटक पहात नाही
वेळ निघून गेल्यावर
जसं आहे तसं स्विकारूघ्यायच
मग दोघांमध्ये झालीच धुसफूस
तर स्वतःलाच दोष द्यायचं
अवाजवी अपेक्षा करण्यापेक्षा
मुलगा होतकरू बघायचा
सुखी संसार होण्यासाठी
मुलीने ही हातभार लावायचा
एकमेकांना समजून घेणे
यालाच विवाह म्हणतात
संपत्ती पाहून केले लग्न तर
दोघांमध्ये विघ्न आणतात
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७