You are currently viewing ते जिवंत परतणार नाहीत…..

ते जिवंत परतणार नाहीत…..

 

भारतीय सैन्याकडून (Indian Army) पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या विरुद्ध मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पिन-पॉईंट स्ट्राईक करण्यात आला आहे. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्वस्त करण्यात आले आहेत, अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे. हा सर्जिकल स्ट्राईक भारतीय सैन्याने नेमका कधी केला याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाहीये.  मात्र, LOC ओलांडून कोणताही गोळीबार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय लष्कराने दिली आहे.

 

आज गुरुवारी पहाटे देखील जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये चार अतिरेक्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं होतं. या कारवाईबाबत लष्करप्रमुख एम. एम नरवणे यांनी म्हटलं की, हा पाकिस्तानसाठी स्पष्ट संदेश होता. पाकिस्तानमधील जे काही दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसखोरी करतील, त्यांच्याबरोबर हेच केलं जाईल. ते जिवंत परतणार नाहीत. सफरचंदांनी भरलेल्या ट्रकमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरूद्ध मोहिम राबविणाऱ्या सैनिकांची लष्करप्रमुखांनी प्रशंसा केली. सुरक्षा दलाच्या वतीने ही एक यशस्वी कारवाई होती. सर्व सुरक्षा दलांमध्ये हे चांगले समन्वय दर्शवत आहे. ठार झालेले चारही दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मदचे असण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं.

जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहेत. तर दुसरीकडे जागतिक स्तरावर दहशतवादविरोधी एफएटीएफकडून होणारी तपासणी टाळण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होत आहे, असं ही सूत्रांनी सांगितलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =