संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून

यंदाच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनची तारीख निश्चित झाली आहे. संसदीय कामकाज समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन घेण्याच्या प्रस्तावाची शिफारस केली होती. केंद्र सरकारने या शिफारशीवर सहमती दर्शवली असून 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन आयोजित केले आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने नव्या मंत्र्यांच्या निवडीबाबत वेगवेगळ्या पातळीवर चर्चा बैठकांचा दूर वाढल्याचे दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा