देवगड भाजपाच्या वतीने खा.नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा
देवगड
देवगड भाजपाच्या वतीने खासदार व भाजप नेते नारायण राणे यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त गरजूंना मदत वृक्षारोपण व विविध घटकांना मदतीचा हात भाजपाच्या वतीने देण्यात आला. भाजपाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा हा प्रकाशचित्राचा आढावा
असलदे येथील वृद्धाश्रमाला फ्रिज व वृद्धांसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या
देवगड येथील ग्रामीण रुग्णालयाला यावेळी कपाट व अन्य वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी.देवगड येथे 11 व 25 किलोमीटरची मॅरेथॉन रॅली घेण्यात आली. या मध्ये यांनी यश मिळवले .
२५ किमी गटात विजेते ठरलेले स्पर्धक:
१) संदेश भुजबळ यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
२) माधव साटम यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
३) जशिथ साटम यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
११ किमी गटात विजेते ठरलेले स्पर्धक:
१) रुद्र चाँदोस्कर यांनी पहिला क्रमांक मिळवत उत्तम कामगिरी केली.
२) शुभम राऊत (दाभोळ) यांना दुसरा क्रमांक मिळाला.
३) ममता राऊत यांनी तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले