You are currently viewing पियाळी गावच्या ग्रामसेवक संगीता पाटील यांना भारतीय नारी रत्न पुरस्कार

पियाळी गावच्या ग्रामसेवक संगीता पाटील यांना भारतीय नारी रत्न पुरस्कार

कणकवली :

 

ग्लोबल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने कणकवलीतील पियाळी गावच्या ग्रामसेवक संगीता पाटील यांना भारतीय नारी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते यशदा ऑडिटोरियम मध्ये सन्मानपूर्वक रजत पदक देऊन पाटील यांना गौरविण्यात आले. स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करत संगीता पाटील यांनी ग्रामसेवक म्हणून ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी म्हणून संगीता पाटील शासनदरबारी दिव्यांगांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी झटत आहेत.

कोव्हीड काळात स्वतःच्या दोन लहान मुलांचा विचार न करता दिव्यांग म्हणून शासकीय सवलत असतानाही पाटील यांनी अहोरात्र मेहनत घेत जनसेवा केली. संगीता पाटील यांच्या याच शासकीय आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नारी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माझ्या दिव्यांग बंधू भगिनींचा असल्याचे पाटील नम्रपणे नमूद करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा