शिक्षकाला मारहाण करणाऱ्या त्या युवकाला अटक करा

शिक्षकाला मारहाण करणाऱ्या त्या युवकाला अटक करा

प्रजासत्ताक दिनी कुडाळ पोलिस स्टेशन समोर शिक्षक भारतीचे “धरणे आंदोलन”

कूडाळ

न्यू.शिवाजी हायस्कूल जांभवडे ता.कुडाळ मधील अनिल काटकर या शिक्षकाला एका माथेफिरू युवकांकडून शाळेच्या आवारात मारहाण झाली होती. या घटनेला सहा दिवस उलटूनही अद्याप सदर युवकाला अटक झालेली नसल्याने याघटनेच्या निषेधार्थ शिक्षक भारतीने सिंधुदुर्ग संघटना आज दि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कुडाळ पोलीस स्टेशनच्या समोर दुपारी 12 ते दु. 3 या वेळेत धरणे आंदोलन छेडणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर कुडाळ पोलिस स्टेशनला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
संघटनेने यापूर्वी दि.२१रोजी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना निवेदन देऊन सदर युवकावर कारवाई करण्याची मागणी केली होती.तरीही अद्यापही अटक न झाल्याने अखेर शिक्षक भारती संघटनेने आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा