You are currently viewing घरोघरी असावा असा ग्रंथ ! “आठवणीतले नामवंत”

घरोघरी असावा असा ग्रंथ ! “आठवणीतले नामवंत”

*घरोघरी असावा असा ग्रंथ !* *”आठवणीतले नामवंत”*

 

*🖊️पुस्तक परिचय: श्री सुरेश ठाकूर, आचरा* 

 

पुस्तकाचे नाव :-

*आठवणीतले नामवंत*

✒️लेखक :-रवींद्र वराडकर

 

प्रकाशन :-

पुस्तक मार्केट पब्लीकेशन

 

स्वागतमूल्य:-रु.५००/-

 

गेल्या २० जानेवारी २०२५ रोजी सावंतवाडी येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हास्तर साहित्य संमेलनात मालवण येथील ज्येष्ठ लेखक श्री. रवींद्र वराडकर यांचे “आठवणीतले नामवंत” हे पुस्तक संमेलनाध्यक्ष, मालवणी नाटककार श्री. गंगाराम गव्हाणकर यांचे हस्ते प्रकाशित झाले. मालवण मुलखाला आणि कोकणाला मोठे करण्यात ज्याचा मोलाचा वाटा आहे अश्या साहित्य, नाटक, चित्रपट, शिक्षण, सामाजिककार्य, राजकारण, कलावंत, पत्रकार, ज्योतिष आणि इतर विविध क्षेत्रातील नामवंतांचा यात परिचय तर आहेच, शिवाय ज्यांचा वाटा सिंहाचा आहे अश्या जवळ जवळ ७४ व्यक्तिमत्वांचा परिचय वराडकर यांनी आपल्या पुस्तकात करून दिला आहे.

यात विविध क्षेत्रातील खालील व्यक्तिमत्वे वराडकर सरांनी रंगविलेली आहेत.

 

*साहित्यिक :-*

१) बालसन्मित्रकार: पारुजी नारायण मिसाळ २) ज्येष्ठ स्वातंत्यसैनिक व लेखिका प्रा. डॉ. सुमती वाळके ३) साहित्यिक प्रा. शरद वराडकर ४) भावकवी गंगाधर मनमोहन महांबरे ५) पत्रकार, लेखक आणि प्राध्यापक मा. अनंत काणेकर ६) स्वप्नरंजनात्मक कथाकार : लुई फर्नाडिस ७) प्रतिभावंत कवयित्री प्रतिभा आचरेकर ८) महान साहित्यिक चिं. त्र्यं. खानोलकर ९) मालवणातील ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर १०) गुरुवर्य प्रा. आ. ना. ऊर्फ आबाजी नारायण पेडणेकर ११) संत चरित्रलेखक रवींद्र धामापूरकर १२) संत चरित्रकार: रघुनाथ ऊर्फ नामू वायंगणकर १३) ऐतिहासिक कादंबरी लेखिका नयनतारा देसाई १४) मराठीतील आघाडीचे कथाकार ह. मो. मराठे १५) ऐतिहासिक कादंबरीकार दिनकर गोविंद वझे १६) वेदनेचे पंख ल्यायलेला कवी विजय चिंदरकर १७) संगीतप्रेमी व ललित लेखक : विद्याधर कृष्णराव जोशी १८) नवकवी सतीश काळसेकर १९) कविवर्य मनोहर तोडणकर २०) साहित्यिक श्री. पुरुष बावकर २१) राष्ट्रीय कवी विनायक २२) भावसुंदर जनकवी पी. सावळाराम २३) निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी २४) इंद्रप्रस्थ ग्रंथाचे लेखक: इंद्रजित सावंत २५) ‘कोपरखळी’कार व कवी शरद पेडणेकर २६) कोकणचा निसर्गकवी डॉ. वसंत सावंत २७) अफाट जिद्दीचा माणूस भाईसाहेब कांबळी २८) मानववंश शास्त्रज्ञ प्रा. डॉ. गोविंद घुर्ये २९) मालवणी कवी रुजारिओ पिंटो ३०) बालसाहित्यिक डॉ. प्रसाद वायंगणकर ३१) ‘साजणी’कार व कवी बाळ तावडे

 

*नाटक व चित्रपट :-*

३२) नाटककार पद्मभूषण मामा वरेरकर ३३) मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी ३४) नाट्य प्रशिक्षणवर्ग प्रशिक्षक डॉ. कृ. रा. सावंत ३५) कलादिग्दर्शक व जागतिक कीर्तीचे चित्रकार: एम. आर. आचरेकर ३६) कामगार रंगभूमिवरील प्रतिभावंत नाटककार: कै. वसंत दुदवडकर ३७) पुराणकथा निवेदक व गुरुवर्य भाऊसाहेब पुराणिक ३८) दशावतारी कलाकार : विनायक कोळंबकर ३९) प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक कमलाकर सारंग ४०) मालवणचा नवोदित नाटककार संदीप चिपकर ४१) नामवंत वक्ते व नाटककार अँड. काशिनाथ गोविंद नातू ४२) ख्यातनाम पार्श्वसंगीतकार दादा परसनाईक ४३) कुशल संगीत नाट्य दिग्दर्शक दाजी परसनाईक ४४) मालवणी नाटककार शंकर शिंदे.

 

*शिक्षण :-*

४५) व्यासंगी साहित्यिक भाऊ कामत ४६) संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक प्रा. संभाजी टिकम ४७) थोर प्राच्यविद्यापंडित डॉ. रामकृष्ण भांडारकर ४८) अर्थशास्त्र अभ्यासक : प्रा. नलिनी पंडित ४९) शिक्षणमहर्षी एच. डी. गावकर ५०) प्रौढ शिक्षणमहर्षी जी. के. गावकर.

 

*सामाजिक कार्यकर्ते :-*

५१) गोरगरिबांचे डॉक्टर ५३) एक महान कर्मयोगी ५५) राष्ट्रप्रेमी कस्टम अधिकारी मामा वराडकर ५२) सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश देऊलकरसर ५४) स्वातंत्र्यसैनिक लेकर ५७) सामाजिक कार्यकर्ते खांडाळेकर विचारवंत बाबा हडकर अभय पोयरेकर ५६) ‘जनयुग’कार मधू वालावलकर रामराव भाऊ पांगे अॅड. भाईसाहेब डॉ. दादासाहेब वराडकर ५८) स्वातंत्र्यप्रेमी व सर्वोदयवादी

*राजकारण :-*

५९) महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बापूसाहेब प्रभूगावकर ६०) प्रजासमाजवादी थोर कार्यकर्ते: श्यामराव कोचरेकर ६१) आमदार व कर्तबगार महिला डॉ. सौ. विनिता सामंत ६२) सामाजिक कार्यकर्ते व आमदार कालिदास कोळंबकर

*मूर्तिकार, नलरंग चित्रकार, वास्तुशिल्पकार :-*

६३) प्रख्यात जलरंग निसर्ग चित्रकार प्रल्हाद धोंड ६४) प्रतिभावंत मूर्तिकार धर्माजी पाटकर ६५) सुप्रसिद्ध वास्तुशिल्पी अरुण बादेकर ६६) प्रदर्शनीय निसर्ग चित्रकार प्रा. श्रीधर बादेकर

 

*पत्रकार :-*

६७) साहित्यिक, पत्रकार व संपादक श्रीपाद वाघ ६८) धाडशी पत्रकार श्रीकांत वसंत देसाई

 

*ज्योतिषशास्त्र :-*

६९) ज्योतिषाचार्य वसंतराव लाडोबा म्हापणकर ७०) ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर

*इतर :-*

७१) ज्येष्ठ कीर्तनकार व ‘भावफुलोरा’ कर्ते कवी ध्रुवकुमार रानडे ७२) हॉटेल उद्योजिका: मेघा सावंत ७३) संशोधक व वस्तुसंग्राहक उदय रोगे ७४) बालविकास कथामाला कार्यकर्ते : सुरेश ठाकूरसर.

अशा चौऱ्याहत्तर व्यक्तिमत्वांचा एकत्र परिचय आपल्याला वाचायला मिळतो. रवींद्र पराडकर हे सिध्दहस्त लेखक आहेत. त्यांचे हे व्यक्तिचित्रणात्मक पहीलेच पुस्तक पण ते अंतरबाहय फारच देखणे झाले आहे. सदर पुस्तकाला चंद्रकांत पारकर (विभागीय सहाय्यक भाषा संचालक (निवृत्त), भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद शाखा यांची प्रस्तावना लाभली आहे.

प्रत्येक प्रदेश मोठा होत असतो. नावलौकिकास येत असतो. तो त्याच्या मातीत जन्म घेतलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वामुळेच. वराडकरांनी ही विविध चौऱ्याहत्तर क्षेत्रातील व्यक्तिमत्वे ‘आठवणीतले नामवंत’ हया एका हारात गुंफली आहेत. त्यांचा हा ग्रंथ एक अमूल्य ठेवा असून मालवणी मुलखातील माणसांच्या घरोघरी असावा असा हा ग्रंथ झालेला आहे.

श्री. रवींद्र वराडकर सर यांचा संपर्क क्र. ८२७५३९०७५०

( *श्री. सुरेश शामराव ठाकूर* ), १२८, शामसुंदर आचरे-पारवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, पिन कोड ४१६ ६१४

मोबा.क. ९४२१२६३६६५

प्रतिक्रिया व्यक्त करा