You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून तरुणांसाठी ‘मायक्रो फायनान्स’ योजना राबविणार – मनीष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून तरुणांसाठी ‘मायक्रो फायनान्स’ योजना राबविणार – मनीष दळवी

बांदा भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार…

बांदा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागातून उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून तरुणांसाठी ‘मायक्रो फायनान्स’ ही अर्थसाहाय्य देणारी योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या महिला, शेतकरी, बचतगटांसाठी अनेक योजना असून या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे केले.

बांदा शहर भाजपच्या वतीने मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन येथील ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, देवस्थान समिती अध्यक्ष सुभाष मोर्ये, माजी सरपंच अशोक सावंत, मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, बाळू सावंत, जावेद खतीब, शामसुंदर मांजरेकर, हुसेन मकानदार, प्रसाद पावसकर, भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदवळे, राकेश केसरकर, बाळा आकेरकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, सिद्धेश महाजन, दशरथ घाडी, दीपक सावंत, गजानन गायतोंडे, सुधीर शिरसाट, राजा सावंत, समीर कल्याणकर, सुनील धामापूरकर, गौरांग शेर्लेकर, निलेश नाटेकर, बाबा काणेकर, निलेश कदम, चंद्रकांत बांदेकर, ज्ञानेश्वर सावंत, साहिल कल्याणकर, महिला तालुकाध्यक्ष अपेक्षा नाईक, किशोरी बांदेकर, शिल्पा सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा