You are currently viewing लवकरच अटल बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

लवकरच अटल बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

लवकरच अटल बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

मुंबई – प्रतिनिधी :-

‘अटल बोगदा’ उभारण्याच्या कामाला २८ जून २०१० रोजी सुरुवात करण्यात आली होती. या बोगद्याचे काम आता लवकरच पूर्णत्वास येऊन, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशाला लेह-लडाखशी जोडणाऱ्या रोहतांग बोगद्याला ‘अटल बोगदा’ असे नाव देण्यात आले आहे. लडाख सीमेवर भारत-चीनमधील संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणारा ‘अटल बोगदा’ आता जवळपास पूर्ण झाला आहे. या सुरुंगमार्गाच्या माध्यमातून लढाखसाठी येण्या-जाण्याचा मार्ग आता संपूर्ण वर्षभर खुला राहणार आहे. चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान सैनिकांसाठी हा ‘अटल बोगदा’ फार उपयोगी ठरणार आहे. कारण सैनिकांना लागणारी हत्यारे व इतर सामान आता वर्षभरात कोणत्याही वेळेस सहजच पोहोचवली जाणे शक्य होणार आहे.

२८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या अटल बोगद्याचे उद्घाटन करणार आहेत. जगातील सर्वात लांब ९ किलोमीटर व १० हजार फूट उंचीवर स्थित असलेल्या या बोगद्याचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. त्यासाठी १० वर्षाचा कालावधी बोगद्याच्या निर्माणीसाठी लागला होता. परंतु आता वर्षभर हिमाचल प्रदेश लेह-लडाख भागाला जोडलेला राहील. त्यासोबतच मनाली ते लेह यांमधील जवळपास ४६ किलोमीटरचे अंतर या बोगद्यामुळे कमी झाले आहे. आत्तापर्यंत थंड वातावरणात बर्फामुळे अनेकदा रोहतांग पास बंद होऊन येण्या-जाण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होत होते. हा ‘अटल बोगदा’ ९ किलो मीटर लांब व १० मीटर रुंद असल्यामुळे मनाली ते लेह अंतर हे अवघ्या १० मिनिटांत पार करणे शक्य होईल. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ ने उभारलेल्या या अटल बोगद्याचे इंजिनीयर ब्रिगेडियर के. पी. पुरुषोथमन यांनी याबद्दल अधिक माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

अटल बोगद्याची वैशिष्ट्ये

# एकाच वेळी अटल बोगद्यातून १५०० ट्रक किंवा ३००० कार प्रवास करू शकतील.
# हा बोगदा बनवण्यासाठी तब्बल ४००० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
# ‘ऑस्ट्रेलियन टनलिंग मेथड’ चा वापर बोगदा बनविण्यासाठी करण्यात आला असून, बोगद्यात हवा खेळती राहण्यासाठी याचा वापर केला आहे.
# यू-टर्न घेण्यासाठी २.२ किलोमीटर नंतर टर्निंग पॉईंट देण्यात आला आहे.
# बोगद्यात प्रत्येक १५० मीटरवर टेलिफोन, ६० मीटरवर फायर हायड्रेन्ट आणि प्रत्येक ५०० मीटरवर इमर्जन्सी दरवाजे लावण्यात आले आहेत.
# तसेच प्रत्येक २५० मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, प्रत्येक १ किलोमीटरच्या अंतरावर ‘एअर क्वालिटी सिस्टम’ लावण्यात आले आहेत.
# बर्फाचा आणि हिमस्खलनाचा अटल बोगद्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
# बोगद्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे वाहतुकीचा वेग आणि अपघातांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
# ८० किलोमीटर प्रतितास वेगाने कोणतेही वाहन या बोगद्याच्या आतून प्रवास करू शकेल. तसेच कोणत्याही प्रकारच्या वातावरणात सहजगत्या वाहतूक सुलभरीत्या करणे शक्य होईल.
# ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO)’ जवान जे सीमेवर रस्त्याची आणि इतर बांधकामे करतात, त्यांनी या बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे.यासाठी बीआरओच्या इंजिनियर आणि कर्मचाऱ्यांना फार मेहनत घ्यावी लागली.थंडीच्या दिवसात या भागात उणे ३० डिग्रीपर्यंत तापमान खाली जाते, तरी या परिस्थितीतही बिआरओच्या जवानांनी हे काम पूर्ण केले.

‘अटल बोगदा’ हा चीनसोबत तणावग्रस्त परिस्थिती असतानाही आणखीन महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे लडाखमध्ये तैनात असलेल्या सैनिकांशी संपर्क साधता येणे सहज शक्‍य होणार आहे. कोणत्याही प्रकारचं सामान, हत्यार जवानांना वेळेवर पुरवण्यासाठी हा ‘अटल बोगदा’ अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडणार आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीतिचा प्रवासही या बोगद्यामुळे सोपा होणार आहे. कारण हाच बोगदा कुल्लू जिल्ह्यातील मनालीतून लाहौल स्पीति जिल्ह्याला जोडण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + twelve =