*ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*||श्रीराम||*
ऋषिमुनीं नी रचल्या ऋचा
इक्ष्वाकू कुल भूषण राजे
राजसौख्य परी नसे अपत्यसुख
प्राप्त झाले अश्वमेध यज्ञ करुन
प्राप्त झाले तेही सुख
यज्ञपुरुष देई पायस
जणू चार वेदांचा जीवनरस
राम जन्मला सुकुमार राजस
नवमी शुध्द त्यात चैत्र मास
वशिष्ठांचे करून यज्ञ रक्षण
मिळाले शत्रु निर्दालनाचे शिक्षण
जिंकले सीता स्वयंवर
लावून धनुष्यास बाण
झालो म्हातारा दशरथ बोले
जावे वानप्रस्थाश्रमा
करूनी राज्याभिषेक रामा
वचनांनी घात केला हायरे दैवा!
विषयधुंद दशरथ वचनबध्द
कैकयला राज्य भरतासाठी
दैवी वनवास होता रामासाठी
कारण झाली दासी मंथरा
सदनी नसता भरत शत्रुघ्न
निरोप देती अयोध्या वासी
सीता राम लक्ष्मणासी
राजपथी रथ हळूहळू चाले
भरत येता परतता अयोध्येसी
माता विधवा, बंधू वनवासी
निजधामी दशरथ, संताप झाला रामाला आणण्या निघाला
भागिरथीला पार करता तटावर
लक्ष्मण बांधे कुटी चित्रकूटावर
मुनीजन आश्रम साधुंचे तपोवन
भरत भेटीने प्रसन्न झाला
परी परतला नाही रसांगे भरताला
पितृवचन पाळून दोघे होऊ कृतार्थ
रामाविण राज्य पदी ठेविल्या पादुका
एकेदिवशी सुवर्ण मृग आला
पकडायला गेले दोघे बंधू
नेली सीता लंकेत दशाननाने
सीतालंकाराच्या संकेताने
शोधत फिरले राम लक्ष्मण
दाखवी दिशा जटायू सोडी प्राण
अजाणता ठरली अहिल्या शापित
पावन संजीवनी रामपदस्पर्श अमृत लाघव
शबरीची बोरे उष्टी
मिळाले फळ नाम भक्तीचे
खल निर्दालन वाली वधाने
मित्र मिळाले सुग्रीव हनुमंत
सागर तरूनी शोध सीतेचा
रम्य जरी होती स्वर्गाहून लंका
धैर्य शौर्य तेजाने दैत्य निर्दालन
इंद्रजित, कुंभकर्ण, अहीमही रावण धाडीला स्वर्गी
कपटी रावण बिभिषण बसला राज्यपदी
सज्जन त्राता दुर्जन वैरी
हनुमंताने शब्द पाळीला
रामा समीप आणली जानकीला
भय शंकित सीता रावणसदनी
लोकसाक्ष शुध्दी केली जानकीने
अग्निने साक्ष दिली व्याकुळ रामाला
संहारुन रावणा राम आले अयोध्येला
विजयाचे गंध वारे अयोध्येत पोचले
बंधुत्वाची अबोल मुर्ती भरत शत्रुघ्न
अयोध्येत झाला राज्याभिषेक रामाला
एकवचनी एकबाणी एकपत्नी राम वदनि
नयनी ध्यानीमनी सुखेनैव राज्य
लावला पावित्र्याला कलंक जनाकारणे
पतितपावन असुन त्याग करी वैदेहीचा
प्रजासुखासाठी प्राण गहाण हा राजधर्म
वनात सोडी लक्ष्मण वहिनीला वाल्मिकी
आश्रमजवळ केला जानकीने
लवांकुश बाळे यौवनातल्या कांतीने सजली.
तरी दैवगती होते वनवास
गाठ पडली अश्वमेध यज्ञासमयी धरला घोडा
लढले दोघे शौर्याने
सीतेने केली कथन कहाणी
लवकुशांना सुपुर्त करून रामापाशी
शतजन्माची पुण्य पतिव्रता
अग्नी शिखा गेली कुशीत
शासनकर्ता रामासम प्रजा हितदक्ष
राज्य केले जनमानसावर
रामाने ना सुटला सीता विरहाचा किनारा
‘रामराज्य’ कुशल राज्याचे प्रतीक
राज्य सुपुर्त करून लवकुशां हाती
श्रीरामाचे शरयुनदीत देहार्पण
||श्रीराम||
*प्रतिभा फणसळकर*
६/४/२५