मुंबईत कला, क्रीडा व कार्यानुभव कृती समितीची विधानसभा उपाध्यक्ष व उच्चपदस्थ अधिकाऱ्यासोबत सोबत बैठक संपन्न
तळेरे
महाराष्ट्र राज्य पातळीवर कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांचे निश्चित धोरण ठरवून कायमस्वरूपी नियुक्ती मिळवून देण्यासंदर्भात तसेच औरंगाबाद हायकोर्ट निकालानुसार कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांना कायमस्वरूपी नियुक्ती, पूर्णवेळ शिक्षकांचा अर्ध पगार देऊन त्यांना कायम शासन सेवेत सामावून घेण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नाम. नरहरी झिरवाळ यांनी कला,क्रीडा व कार्यानुभव कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीवरून विधान भवनामध्ये शासकीय बैठकीचे आयोजन केले होते, या बैठकीत सन 2011 पासून ते 2019 पर्यंत कार्य केलेल्या सर्वच निदेशकांचा विचार करता प्राप्त परिस्थितीत शालेय स्तरावर कायमस्वरूपी नियुक्ती मिळून देण्यासाठी कृती समितीने मागणी केलेली होती तसेच 100 पट व 100 पटापेक्षा कमी पट असा भेदभाव न ठेवता केंद्रातील जवळच्या दोन शाळेचा कार्यभार देऊन, इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 चा कार्यभार देऊन केंद्राकडे शासनाच्या वतीने प्रस्ताव सादर करणार आहेत, तसेच कोर्टाच्या आदेशाने अर्धवेळ पुर्ण शिक्षकाचा अर्ध वेतन देणार, निश्चित स्वतंत्र प्रवर्ग तयार उपाध्यक्ष ना.झिरवाळ यांनी तसा जीआर पारित केला जाईल,असा विविध मुद्दे घेऊन कला,क्रीडा,कार्यानुभव शिक्षकांसाठी चांगले धोरण तयार करून नियुक्ती मिळणार आहेत असे आश्वासन उच्चपदस्थ अधिकारी यांनी मा. नामदार विधानसभेचे उपाध्यक्ष मा.झिरवाळ यांना दिले आहे.
l
ही बैठक महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष नामदार झिरवाळ, शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण संचालनालय, क्रीडा विभाग, समग्र शिक्षण, एमपीएसपीचे उच्चपदस्थ अधिकारी तसेच शारीरिक शिक्षक संघटनेचे शिवदत्त ढवळे, राजेंद्र कोतकर, ज्ञानेश काळे तसेच कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश भोसले, उपाध्यक्ष राजू उलेमाले, सचिव नितीन चौधरी, कार्याध्यक्ष संजय भोसले, नाशिक विभागाचे गायकवाड, श्री.बोरगुडे, मुक्तार शेख, श्री.धूम, सतीश गाढवे,श्री.महाले, श्री.शेळके, श्री.बेंडके, श्री.भांगरे, अन्य पदाधिकारी उपस्थित होते
मुंबई: विधानभवनात उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कला,क्रीडा व कार्यानुभव कृती समितीचे पदाधिकारी