सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी व तथागत नागरी पतसंस्थे तर्फे शुभेच्छा..
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता श्री अजयकुमार सर्वगोड यांची सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी व तथागत नागरी सहकारी पतपेढी सिंधुदुर्ग संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना सेवानिवृत्तीच्या सदिच्छा दिल्या. यावेळी तथागत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजु ज्येष्ठ संचालक रमेश कदम, मोहन जाधव इत्यादी उपस्थित होते श्री सर्व गोड यांनी पतसंस्थेला इन्व्हर्टर देणगी दाखल दिला आहे. या भेटीत पतसंस्थेच्या वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्यांनी श्री सर्वगोड यांनी पतसंस्थेकडून समाजातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना स्वयंरोजगार प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. संस्थेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.