You are currently viewing चित्ती वसावा श्रीराम

चित्ती वसावा श्रीराम

*कोकण मराठी साहित्य परिषदेचे सन्मा.सदस्य कवी विजयकुमार मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चित्ती वसावा श्रीराम*

 

एकबाणी, एकपत्नी, एकवचनी श्रीराम

मुखी रामनाम आणि चित्ती वसावा श्रीराम

 

रामनामामध्ये असे अशी ताकद अनोखी

रामनामाच्या जपाने झाला वाल्याचा वाल्मिकी

जळी पाषाण तरले कसे लिहिता श्रीराम

मुखी रामनाम आणि चित्ती वसावा श्रीराम

 

रामनाम घेता झाला शंकराचा दाह शांत

रामभक्तीमुळे झाला प्रिय भक्त हनुमंत

दाखविला त्याने त्याच्या हृदयीचा प्रभू राम

मुखी रामनाम आणि चित्ती वसावा श्रीराम

 

पदस्पर्शाने रामाच्या अहिल्याही शापमुक्त

उष्टी बोरे शबरीने दिली झाली प्रिय भक्त

दिले दर्शन सदनी झाला प्रसन्न श्रीराम

मुखी रामनाम आणि चित्ती वसावा श्रीराम

 

ज्याच्या जीवनात राम त्याचे जगणे निवांत

ज्याच्या जीवनी ना राम त्याला सदाचीच भ्रांत

रामनामानेच मिळे जीवनालाही विराम

मुखी रामनाम आणि चित्ती वसावा श्रीराम

 

— विजयकुमार शिंदे

कणकवली

प्रतिक्रिया व्यक्त करा