You are currently viewing गृहनिर्माण संस्थेमधील पाळीव प्राण्यांच्या मालकांचे हक्क आणि कर्तव्य

गृहनिर्माण संस्थेमधील पाळीव प्राण्यांच्या मालकांचे हक्क आणि कर्तव्य

महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन लि. आणि अस्मिता कॉलेज ऑफ लॉ यांच्या सहकार्याने प्राण्यांचे / गृहनिर्माण संस्थेमधील पाळीव प्राण्यांच्या मालकांचे हक्क आणि कर्तव्य या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेचा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ६५० श्रोत्यांनी सिस्को वेबँक्स ॲप वरून लाभ घेतला. फेडरेशन चे तज्ञ संचालक श्रीयुत अविनाश चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यशाळेत फेडरेशन चे अध्यक्ष सीताराम राणे, सचिव श्रीमती छाया आजगावकर आणि उपाध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी उपस्थितांचे स्वागत करून या कार्यशाळेमुळे संस्थेमधील पाळीव प्राण्यांबद्दलचे वाद मिटतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

अस्मिता कॉलेज च्या फ्री लीगल एड चे प्रमुख आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रोफेसर केशव तिवारी यांनी सर्व उपस्थितांना पाळीव प्राणी आणि त्यांचे मालक यांच्यामधील संबंध कसे असावेत या विषयाबद्दल मार्गदर्शन केले. प्रॉफेसोर केशव तिवारी आणि त्यांच्या लीगल एड टीम ने समाजातील विविध घटकांचे सर्वेक्षण करून विशेष माहिती गोळा केली आणि त्याचे मुद्देसूद सादरीकरण सर्व उपस्थितांसमोर केले.

या सर्वेक्षणांतील मुखत्वे मुलाखती या पोलीस अधिकारी, प्राणीमित्र, पाळीव प्राण्यांचे मालक आणि सोसायटी मधील सभासद अशा विविध लोकांच्या घेण्यात आल्या. या मुलखींनमधून पाळीव प्राणी, त्यांचे मालक आणि सोसायटी मधिल सभासद याना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील करण्यात येणारे उपाय या बद्दल सखोल माहिती देण्यात आली. या गोळा केलेल्या माहितीमध्ये पाळीव प्राणी आणि प्राण्यांविरूद्ध काही हृदय हेलावून टाकणाऱ्या गुन्ह्यांचा देखील समावेश आहे, ज्याचे वेबिनार दरम्यान तपशीलवार स्पष्टीकरण देण्यात आले.

प्रोफेसर केशव तिवारी यांनी भारतीय राज्य घटनेतील अनेक अनुच्छेद , तसेच पाळीव प्राणी, पाळीव प्राणी मालक आणि सोसायटीतील इतर रहिवाशांच्या हक्क आणि कर्तव्याशी संबंधित आयपीसीमधील अनेक कलमांबद्दल येथे माहिती दिली.

स्वच्छ भारत अभियान जर खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक स्तरात यशस्वी करायचे असेल तर पाळीव प्राण्यांच्या मालकांनी जेव्हा ते त्यांच्या प्राण्यांना फेरफटका मारायला घेऊन जातात तेव्हा सोबत पुप बॅग घेऊन जाण्यास सुरवात करावी असे आवाहन हि या वेबिनार मध्ये करण्यात आले.

त्यानंतर श्रीप्रसाद परब यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद १३ आणि १४ तसेच राज्यघटनेच्या राज्य धोरणाचे निर्देशात्मक तत्त्वे याबद्दल माहिती देत त्यांचा पाळीव प्राणी आणि पाळीव प्राणी मालकांच्या हक्क आणि कर्तव्याबद्दल हे अनुच्छेद कसे विचारात घेतले जाऊ शकतात याबद्दल सखोल माहिती दिली.

प्राणी आणि मानव यांच्यातील सहजीवनाचा ताळमेळ योग्य रीतीने झाल्यास निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि यासाठी समाजातील प्रत्येक श्रेणीमध्ये जागरूकता आणण्यासाठी अस्मिता कॉलेज ऑफ लॉ चे फ्री लीगल एड कटिबद्ध आहे असे आश्वासन प्रोफेसर केशव तिवारी यांनी या वेबिनार मध्ये दिले.

“एखाद्या राष्ट्रात तेथील प्राण्यांसोबत ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते त्यावरूनच त्या देशाच्या महानतेचे दर्शन होते.” या महात्मा गांधीजींच्या उद्गगारांची आठवण करून देत प्रा. केशव तिवारी यांनी आपल्या सादरीकरणाची सांगता केली. कार्यक्रमा शेवटी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन लि. चे संचालक श्री भास्कर म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 4 =