You are currently viewing लंका दहन

लंका दहन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. स्मिता श्रीकांत रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लंका दहन*

 

क्रोधित रावण करता सीतेचे हरण

करी रुदन लंकापुरी अशोक वनी

हनुमंताला मिळता आज्ञा श्रीरामाची

शुभ वार्ता कळावी प्रियाला मुद्रिकेनी ||१||

 

सागरी उड्डाण मारीले शिरसा राक्षसी

सोन्याच्या लंकेत शोधी नजर सीतामाई

राक्षसी गराड्यात विलाप करी विरहिणी

नजरेस पडता संदेश देण्या हर्षित होई ||२||

 

शक्ती ची देवताचे उड्डाण करण्या लंका दहन

रामाचा दूत लक्ष्मणासाठी आणिली संजीवनी

भगवतीस सोडवण्या हनुमंत सागरी झेप घेई

जाळीली सोन्याची लंका रामभक्त हनुमानानी ||३||

 

गर्जना करीत अशोक वन होई उध्वस्त

समाचार कळता रावण देई आज्ञा पुत्राला

राक्षसींचा करता वध होई लंकापुरी नष्ट

महिमा जाणुन इन्द्रजीत सोडी ब्रम्हास्त्राला ||४||

 

इन्द्रजीत आवळी अंजनीसुतास नागपाशाने

हनुमंताच्या शेपटीला लावा आग आज्ञा दिली

शेपुट होई लांब लांब संपली नगरातील वस्त्रे

हनुमान मारी उड्या,अग्नीने लंका उजाड केली ||५||

 

रावणाचा गर्व हरण करण्या राम लक्ष्मण निघे

उभारण्या रामसेतु धाडली वानरसेना सुग्रीवाने

बिभीषणाला राज्य देऊनी आणी सीतेला स्वगृही

अयोध्या नगरी सजली गुढ्या,पताका,तोरणाने ||६||

 

सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा