You are currently viewing अर्णव गोस्वामींच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने छेडले आंदोलन…

अर्णव गोस्वामींच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने छेडले आंदोलन…

ओरोस
अर्णव गोस्वामी विरोधात सिंधूदुर्गनगरीमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसने सोमवारी आंदोलन छेडले. यावेळी अर्णव यांना पाठीशी घालणाऱ्या केंद्र सरकार, भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. अर्णव यांची प्रतिमा यावेळी जाळण्यात आली. जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे व महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाला प्रदेश सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, प्रकाश जैतापकर, दादा परब, अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, विजय प्रभू, इरशाद शेख, मंदार शिरसाठ, पल्लवी तारी, जेम्स फर्नांडिस, स्मिता वागळे, अमीदी मेस्त्री, चिन्मय बांदेकर, समीर वंजारी, उल्हास शिरसाठ, योगेश्वर क़ुर्ले, महेश परब, हीरोजी परब, प्रदीप मांजरेकर, महेंद्र सांगेलकर, मेघनाथ धुरी, मोहन ओरसकर, नीलेश तेली, महेश तेली, संदेश कोयंडे, फिजा मकाणदार, जैस्मिन लक्ष्मेश्वर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी यानी विविध घोषणा दिल्या. ‘कॉंग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘भाजप पक्षाचा निषेध असो’, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध असो’, ‘अर्णव गोस्वामी यांचा निषेध असो’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी अर्णव यांची प्रतिमा दहन करण्यात आली. ‘अर्णव यांना अटक करा’, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =