You are currently viewing खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भाजपातर्फे विविध कार्यक्रम

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भाजपातर्फे विविध कार्यक्रम

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भाजपातर्फे विविध कार्यक्रम

९ एप्रिल रोजी बास्केटबॉल स्पर्धा तर १० एप्रिल रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन,

जि. प. गटात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

मालवण :

भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्याच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिसानिमित्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील निमंत्रीत संघांची टोपीवाला हायस्कूल येथे ९ एप्रिल रोजी बास्केटबॉल स्पर्धा, १० एप्रिल रोजी चार गटामध्ये मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर जिल्हापरिषद गटामध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत अशी माहिती तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी नगरसेवक राजन वराडकर, खरेदी विक्री संघाचे संचालक आबा हडकर, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, नंदू देसाई, विक्रांत नाईक, दाजी सावजी, राजन गावकर, पप्पू सामंत, रवि टेंबुलकर, नारायण लुडबे, अमू हडकर, महानंदा खानोलकर, पूजा वेरलकर, तारका चव्हाण, हरमळकर, प्रसाद चव्हाण व इतर उपस्थित होते. बुधवार, ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धा सुरु करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील नामांकित संघांना या स्पर्धेत पाचारण करण्यात येणार आहे. तर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पंधरा वर्षाखालील मुली (देऊळवाडा पूल ते कोळंब) प्रथम तीन क्रमांक ३०००, २००० व १००० रुपये व प्रशस्तीपत्रक, पंधरा वर्षांखालील मुलगे (देऊळवाडा पूल ते कोळंब) प्रथम तीन क्रमांक ३०००, २००० व १००० रुपये व प्रशस्तीपत्रक, महिला खुला गट (देऊळवाडा पूल ते कोळंब) प्रथम तीन क्रमांक ५०००, ३०००, व २००० रुपये व प्रशस्तीपत्रक, पुरुष खुला गट (देऊळवाडा पूल ते कोळंब ते देऊळवाडा पूल) प्रथम तीन क्रमांक ५०००, ३०००, व २००० रुपये व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. महिलांच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पूजा वेरलकर ९४२१२३६२९०, तारका चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा. तर पुरुष गटासाठी ताराचंद पाटकर ९९७५९८७५३०, ललित चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा