सावंतवाडी शहरात आरटीओ कॅम्प करिता जागा उपलब्ध करून दयावी…

सावंतवाडी शहरात आरटीओ कॅम्प करिता जागा उपलब्ध करून दयावी…

अ‍ॅड. परिमल नाईक यांची प्रसिद्धीपत्रका द्वारे मागणी

सावंतवाडी

शहरात आरटीओ कॅम्प करिता जागा उपलब्ध करून दयावी, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. परिमल नाईक यांनी सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या कडे मागणी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोविड-१९ च्या कालावधीत नियमित मासिक आरटीओ कॅम्प हे सावंतवाडी शहरात सुरवातीला शासन निर्बंध असल्यामुळे आयोजित होऊ शकले नाहीत. परंतु आता सर्व निर्बंध शासनाने उठविले असताना सुद्धा सोयीस्कर जागे अभावी सावंतवाडी शहरात आरटीओ कॅम्प आयोजित होऊ शकत नाहीत. पूर्वी ते शासकीय विश्रामग्रह येथे होत होते. परंतु सदर ठिकाणी आरोग्य खात्यामार्फत कोविड-१९ चाचणी केंद्र स्थापित केल्याने व पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने सावंतवाडी तालुक्यातील गरजवंताना नाहक वेंगुर्ला व दोडामार्ग येथे हजर राहण्याची सूचना आरटीओ कार्यालयातुन देण्यात येते. सदर बाब वेळ व पैसा या दोन्ही बाबींकरिता खर्चिक व त्रासदायक ठरत असल्यामुळे अ‍ॅड. परिमल नाईक यांनी आरटीओ कार्यालयात विचारणा केली असता सावंतवाडी शहरात पर्यायी जागा उपलब्ध नाही असे कळविण्यात आले. वस्तूत: सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान किंवा अन्य सोयीस्कर ठिकाणी पर्यायी जागेची व्यवस्था सहजच होण्यासारखी असून तेथे सावंतवाडी नगरपरिषदेच्या अखत्यारीतील जागा व इमारत मासिक आरटीओ कॅम्प करिता उपलब्ध करून द्यावी व शहर व तालुक्यातील सामान्य जनतेला होणारा मानसिक -शारीरिक -व आर्थिक त्रास दूर करावा, अशी मागणी अँड. परिमल नाईक यांनी सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी जयंत जावडेकर व नगराध्यक्ष सच्चीदानंद परब यांच्याकडे केली. सदर निवेदनाला प्रतिसाद देताना आरटीओ कार्यालय येथून मागणी पत्र प्राप्त झाल्यास सकरात्मक विचार करण्यात येईल, अस मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी संगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा