दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत संजय राऊत याचं मोठं विधान!!!!

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत संजय राऊत याचं मोठं विधान!!!!

भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल जगभरातून घेतली जातेय. जगभरातील माध्यमांचं आपल्यावर लक्ष आहे. उद्या दिल्लीत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली, ट्रॅक्टर परेड निघणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इतर विविध आंदोलने सुरु आहेत.

मुंबईतदेखील मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी एकत्रित आलेले आहेत. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शेतकरी मुंबईत दाखल झालेत. मात्र असं असलं तरीही मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी येत असताना मुंबईतून अजूनही कोरोना गेलेला नाही त्याची काळजी घ्यायला हवी. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने नवीन संकट पुन्हा महाराष्ट्रात पसरेल अशी चिंता मुख्यमंत्र्यांना आहे असं संजय राऊत म्हणालेत .

प्रतिक्रिया व्यक्त करा