You are currently viewing कणकवली चोरट्यांचा सुळसुळाट; कलमठ गुरववाडी येथे झाली चोरी

कणकवली चोरट्यांचा सुळसुळाट; कलमठ गुरववाडी येथे झाली चोरी

कणकवली चोरट्यांचा सुळसुळाट; कलमठ गुरववाडी येथे झाली चोरी

कणकवली

कणकवली तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे.
कणकवली कलमठ येथील गुरववाडी मधील रुपेश जाधव यांच्या घरात धाडसी चोरी झाली आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली . यामध्ये चोरट्याने घरामध्ये घुसून आत मध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या बेडरूमला बाहेरून कडी घातली व बाहेरील सामान विस्कटून टाकले आहे. काही साहित्य आणि दुचाकी चोरट्याने घेऊन पलायन केले आहे. त्यामुळे घरात माणसं असताना ही धाडसी चोरी झाली आहे.
सोमवारी रात्री देखील कणकवली शहरांमध्ये एका ठिकाणी चोरी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच ही चोरी झाल्याने कणकवली चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा