आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सतीश सावंत यांचा वाढदिवस कणकवलीत साजरा…

आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सतीश सावंत यांचा वाढदिवस कणकवलीत साजरा…

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीशजी सावंत यांचा वाढदिवस आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी आ.वैभव नाईक यांनी शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन सतीश सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सतीश सावंत यांच्या माध्यमातून कणकवली मतदार संघात सुरू असलेल्या कार्याबद्दल आ.वैभव नाईक यांनी गौरवोद्गार काढत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजू शेटये, बाळा भिसे, शैलेश भोगले, संजय आंग्रे, नीलम पालव, स्वरूपा विखाळे, राजलक्ष्मी डिचोलकर, भास्कर राणे, कन्हैया पारकर, राजू राठोड, हर्षद गावडे, संदेश पटेल, अनुप वारंग, वैदेही गुडेकर, रश्मी बाणे, लतिका म्हाडेश्वर, बाळू मेस्त्री, निसार शेख, दिलीप मडये, प्रमोद कावले, विलास गुडेकर, प्रसाद अंधारी, रामू विखाळे, दामू सावंत, योगेश मुंज, सुनील पारकर आदींसह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा