You are currently viewing माईण येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत घर भस्मसात

माईण येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत घर भस्मसात

कणकवली : कणकवली तालुक्यातील माईण येथील अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले. सदरची आग ही शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पंचनामा सुरू होता. आगीची घटना समजताच घटनास्थळी गावातील नागरिकांनी धाव घेतली तसेच कणकवली पोलीस व कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबही दाखला झाला होता. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.

घराला आग लागली त्यावेळी घरात दोन सिलेंडर होते. एक सिलेंडर बाहेर काढण्यात यश आले तर दुसऱ्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र घराचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा