भाजपच्या वतीने कुडाळ कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध..

भाजपच्या वतीने कुडाळ कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध..

*भाजप जिल्हाउपाध्यक्ष रणजित देसाई, नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांच्या माध्यमातून मदत..*

कुडाळ :

कुडाळच्या कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडरची तातडीची गरज आहे हे समजताच आज २९ एप्रिलला भाजपच्यावतीने भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष रणजित देसाई आणि कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेविका संध्या तेरसे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कुडाळ तहसीलदार अमोल फाटक, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे, नगरसेवक सुनील बांदेकर, भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, रेखा काणेकर, नगरसेवक तथा शहराध्यक्ष राकेश कांदे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा