दत्तकृपा प्रतिष्ठान वैभववाडीच्या वतीने भव्य स्वागत यात्रेने वैभववाडीत नविन वर्षाचे स्वागत
वैभववाडी
दत्तकृपा प्रतिष्ठान वैभववाडीच्या वतीने आयोजित वैभववाडी लोकोत्सव २०२५ चा शुभारंभ गुड्डीपाडव्याच्या मुरहूर्तावर रविवारी सायंकाळी भव्य शोभा यात्रेने कारण्यात आला. दत्तमंदिर वैभववाडी ते संभाजी चौक अशी शोभा यात्रा काढण्यात आली. लोकोत्सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोभायात्रेत बैलगाडया, ढोल पथक, वारकरी दिंडी, यांच्यासह नागरिक मोठया संख्येने हातात भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले. शोभा यात्रेतील लहान मुलांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्षवेधून घेतले.शोभा यात्रेची सांगता दत्तमंदिर येथे करण्यात आली.
पुढचे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी खेळ पैठणी अंतर्गत विविध स्पर्धा होणार आहेत .त्यामध्ये विजेत्या महिलांना गृहउपयोगी किमती बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये पैठणीसह फ्रीज, कुकर,गॅस शेगडी, किचन सेट अशी अनेक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांच्या विविध स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आले आहे. या लोकसभेनिमित्त लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले असून विजेता सोन्याचे नाणे मिळणार आहे. याशिवाय अन्य बक्षीसांची ही या महोत्सवात लय लूट करता येणार आहे.