बॉम्ब शोधक प्रशिक्षणामध्ये राज्यात द्वितीय येण्याचा मिळवला मान
सिंधुदूगनगरी
बॉम्ब शोध प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी मध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केऋल्याबद्दल बॉम्ब शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक अवधूत बनकर यांचा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे ,पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला राज्य गुप्तवार्ता पोलीस अकादमी पुणे यांच्या वतीने सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी यांचे साठी बॉम्बशोधक व नाशक बाबत प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते सदर प्रशिक्षणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून 53 पोलीस अधिकारी यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथकातील पोलिस उपनिरीक्षक अवधूत बनकर यांची निवड करण्यात आली होती सदर प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांचेकडून सर्व प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी यांची लेखी तसेच विविध प्रात्यक्षिकासह अतिशय कठीण स्तरावर प्रशिक्षण घेण्यात येते सदर प्रशिक्षणा मध्ये प्रात्यक्षिकांमध्ये जास्तीत जास्त भर देण्यात येतो सदर प्रशिक्षण अंती घेण्यात आलेल्या विविध प्रात्यक्षिकांमध्ये महाराष्ट्रतील सर्व पोलीस अधिकारी यांचे मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक अवधुत बनकर यांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांच्या सर्व प्रशिक्षणार्थी यांच्या मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकावून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचा पोलीस मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राउंड कवायत मैदानावर पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.