नामदेव खोत याची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड
सावंतवाडी
जि प पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नंबर १ मधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कुमार नामदेव प्रवीण खोत याची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश इयत्ता सहावी सन २०२५- २६ साठी निवड झाली आहे .ही प्रवेश परीक्षा जानेवारी २०२५ मध्ये झाली होती.
नामदेव खोत याला वर्गशिक्षक श्री बापूशेठ कोरगावकर सर यांचे मार्गदर्शन लाभले .नामदेवच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास नाईक, पदवीधर शिक्षक श्री.युवराज गोसावी, उपशिक्षिका मनीषा मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मेस्त्री, उपाध्यक्ष श्रीम् सिया नाईक, केंद्रप्रमुख श्री लक्ष्मीदास ठाकूर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रमोद पावसकर, गटशिक्षणाधिकारी श्रीम.कल्पना बोडके मॅडम ,पालक ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.