You are currently viewing पुर्वा वाळके हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

पुर्वा वाळके हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

पुर्वा वाळके हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

स्पर्धात्मक परीक्षेत उल्लेखनीय यश

देवगड

जानेवारी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिठमुंबरी नं. १ येथील कु. पुर्वा शरद वाळके हिने नेत्रदीपक यश संपादन करून नवोदय विद्यालयासाठी निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेले हे यश तिच्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचा विजय असुन तिने आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

यावेळी मिठमुंबरी गावाचे सरपंच बाळकृष्ण गावकर यानी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रतिष्ठित संस्थेत संधी मिळणे अभिमानास्पद आहे. पुर्वाने कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

तसेच, देवगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी या शाळेत भेट देऊन पुर्वाचे अभिनंदन केले. कुणकेश्वर केंद्र बलाच्या केंद्रप्रमुख भाग्यश्री जोईल, मुख्याध्यापक मधुसूदन घोडे आणि शिक्षकवृंद यांनीही तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच ग्रामस्थांनीही तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा