You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प – १५ – वे

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प – १५ – वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

___________________________

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प – १५ – वे

_________________________

स्वामी समर्थांची भ्रमण गाथा-

 

श्री स्वामी चरणी प्रार्थना । अर्पिली ही लेखन कामना ।

केली विनवणी स्वामींना । द्यावी मज लेखन प्रेरणा ।। १ ।।

 

स्वामींनी दाखविता वाट । उजाडे नवी पहाट । प्रसन्न अशी ही पहाट। करू स्मरण सद्गुरूंचे ।। २ ।।

 

स्वामींनी प्रवास केला । आरंभी हिमालय पाहिला ।फिरता फिरता भारत पाहिला । मुक्काम शेवटी अक्कलकोटी ।।३।।

 

हिमालय, जगन्नाथपुरी । तिथुनी जाती हरिद्वारी । पुढे कच्छ,

नि द्वारका नगरी । पुढे गिरनार पर्वतराजी ।।४ ।।

 

क्षेत्र अंबाजोगाई,रामेश्वर,राजूर ।मंगळवेढा,मोहोळ,सोलापूर । इतके फिरल्यावर । आले स्वामी अक्कलकोटी ।। ५ ।।

 

स्वामी समर्थांची भ्रमण गाथा । नसे चमत्कार-कथा ।

भक्तांसाठी प्रचिती कथा । स्वामी कार्याची ।।६ ।।

 

स्वामींचे हे भ्रमण । यापुढे येईल स्थल-काल वर्णन ।

घ्या भक्त हो जाणून । थोर कार्य समर्थांचे ।। ७ ।।

***************************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी- अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.

__________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा