अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचे पिल्लू मृत्युमुखी
आंबोली
अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे आंबोली-जकातवाडी येथे सांबराच्या पिल्लाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. याबाबतची माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे प्रथमेश गावडे, राकेश अमृतकर, वसंत गावडे, आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला वनविभागाच्या ताब्यात दिले, परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर वन विभागाच्या माध्यमातून त्या पिल्लाचा मृतदेह जाळून नष्ट करण्यात आला.