*पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार जनतेच्या गाठीभेटी*
*येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात स्वीकारणार जनतेची निवेदने
सिंधुदुर्ग
मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत ते जनतेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहेत. प्रत्येकाला भेटणार आहेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार आहेत. तरी या वेळी जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.