You are currently viewing रोज येतो इथे तो डुंबायला

रोज येतो इथे तो डुंबायला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रोज येतो इथे तो डुंबायला*

 

होता *पश्चिमा* लाल रंगाची

संपत असते त्याची *ड्युटी*

घामेजून तो असे थपथपलेला

ड्युटी संपण्यापूर्वी घेतो सुट्टी

 

रोज येतो इथे तो डुंबायला

स्नान करून जातो घराला

बांधून झोपडी डोंगरापल्याड

खाऊन भाकर लागतो घोरायला

 

झोपतो मढ्यावाणी डाराडूर

कोंबडा आरवता चोळीत डोळे

ड्युटीवर निघतो होऊन मजबूर

सोबत असती *शुभ्र बगळे*

 

धरून अडवलेले धरण पाणी

लागता चाहूल दिनकर देवाची

सोन किरणामधे घेते न्हाऊन

तहान भागविते *गाई गुरांची*

 

कर्मठ कोणी तपस्वी बगळे

तप करती *एका पायावर*

अवखळ कोणी लबाड मीन

टपून बसती *तप भंगावर*

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा