You are currently viewing आज ३ ऑगस्ट रोजी श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे धार्मिक कार्यक्रम!

आज ३ ऑगस्ट रोजी श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे धार्मिक कार्यक्रम!

मालवण/ मसदे:

 

श्री श्री १०८ महंत मठाधिश परम पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे अधिक मासाचे औचित्य साधुन आज गुरुवार दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी -९ वा श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. महाआरती नंतर सकाळी ११- वा -श्री श्री१०८ महंत प पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे अध्यात्मिक मागदर्शन, दुपारी १२:३० महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविक, भक्तांनी, सेवेकरी यांनी उपस्थित राहून दर्शन, तीर्थ-प्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि. संलग्नश्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा