You are currently viewing चेहरा…

चेहरा…

चेहरा…

तो चेहरा
मनाला भावणारा
सतत नजरेसमोर
हवाहवासा वाटणारा
एका छोट्याश्या हास्याने
मरगळलेल्या शरीरातही
नवीन उर्मी जागवणारा
तो चेहरा, फक्त तुझा…

माझ्यासाठी उच्चारलेला
एक शब्दही मनात रुजवणारा
नजरेच्या एका कटाक्षाने
मज घायाळ करणारा
विलक्षण ओढीने मज
आपणाकडे खेचून घेणारा
तो चेहरा, फक्त तुझा…

कधी डोळ्यांतल्या अश्रूंनी
माझं मन सुद्धा रडवणारा
तर कधी आनंदाश्रूंनी
माझा खांदा भिजवणारा
कधी थरथरत्या ओठांनी
मनातल्या मनात पुटपुटणारा
तो चेहरा, फक्त तुझा…

स्वतःची दुःखही आपल्याच
चेहऱ्या आड दडवणारा
दुसऱ्याच्या सुखासाठी
उसनं हास्य फुलवणारा
आंतरिक ओढीने, प्रेमाने
सर्वांना आपलेसे करणारा
तो चेहरा, फक्त तुझा…
तो चेहरा..!

(दिपी)
दीपक पटेकर
९४२१२३७५६८

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 9 =