You are currently viewing किर्लोस्कर ऑईल इंजिन्सने वेळेपूर्वीच पूर्ण केला अकरावा वेतन करार

किर्लोस्कर ऑईल इंजिन्सने वेळेपूर्वीच पूर्ण केला अकरावा वेतन करार

*किर्लोस्कर ऑईल इंजिन्सने वेळेपूर्वीच पूर्ण केला अकरावा वेतन करार*

पिंपरी

किर्लोस्कर समूहाच्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड या खडकी येथील कंपनीने आपला अकरावा वेतन करार नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न झाल्याने औद्योगिक इतिहासात नवा मापदंड प्रस्थापित झाला आहे. ही महत्त्वाची घटना किर्लोस्कर ऑईल इंजिन्स यांच्या कामगार कल्याण, औद्योगिक सौहार्द आणि शाश्वत विकासाच्या प्रति बांधील असल्याचे प्रतीक आहे.

वेतन करार सोहळ्यास कंपनीचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर, व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल सहाय, मुख्य मानव संसाधन अधिकारी जॉर्ज वर्गीस, मुख्य वित्तीय अधिकारी सचिन केजरीवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी (संचालन) मकरंद जोशी, बीटूबी विभागाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी अमरजित सिंग, उत्पादन विभागातील मानव संसाधन विभाग प्रमुख वीरेंद्र गायकवाड, कारखाना व्यवस्थापक मिलिंद बोटे आणि मानव संसाधन विभाग व्यवस्थापक मधुकर गवस यांच्यासह वरिष्ठ व्यवस्थापनातील प्रमुख सदस्य उपस्थित होते. कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष संजीव गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र येडे, सचिव उल्हास खुटवड आणि कोषाध्यक्ष विकास कोरे यांनी प्रतिनिधित्व केले. हा करार कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील परस्पर विश्वास, सहकार्य आणि सामाजिक मूल्यांचे प्रतीक आहे.

वेतन करार वेळेअगोदर आणि प्रगतिशीलपणे पूर्ण करण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण इतिहासाचे द्योतक म्हणून २०११ मध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे झालेले वेतन करार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहेत.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा