You are currently viewing कुणाल कामराचा कुडाळ युवासेनेकडून निषेध

कुणाल कामराचा कुडाळ युवासेनेकडून निषेध

कुणाल कामराचा कुडाळ युवासेनेकडून निषेध

कुडाळ पोलिसांना निषेधाचे निवेदन केले सादर

कुडाळ

स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रातील राजकारण यांची कवितेद्वारे खिल्ली उडविली. या वक्तव्याचा कुडाळ तालुका युवासेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला. या वक्तव्याबद्दल कुणाल याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी, तसे न झाल्यास युवासेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन आज, सोमवारी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना कुडाळ तालुका युवासेनेतर्फे देण्यात आले. यावेळी युवासेना कुडाळ तालुका प्रमुख सागर वालावालकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, उपजिल्हा प्रमुख संदेश नाईक, उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ, उप तालुकाप्रमुख वासुदेव सावंत, शहरप्रमुख आबा धडाम, उप विधानसभा प्रमुख चेतन पडते, तालुका सचिव साईराज दळवी, उप शहरप्रमुख प्रथमेश कांबळी, उप तालुका सचिव विनोद सावंत, लवू कदम, संदेश सुकळवाडकर,

कुमार राठोड, योगेश घुले आदी युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा