You are currently viewing बिळवस ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारत लोकार्पण सोहळा उद्या

बिळवस ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारत लोकार्पण सोहळा उद्या

मालवण

बिळवस ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा ९ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे विनायक ठाकुर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अमित आवटी, उपअभियंता सावर्डेकर, बिळवस सरपंच पालव, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सकाळी ८.३० वाजता गणेश पूजन, सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ, १०.३० वाजता मान्यवरांचे स्वागत, उपस्थितांचा व जमिनमालकांचा सत्कार समारंभ – कार्यक्रम व मनोगत, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, ३ वाजता सत्यनारायण पूजा, सायं. ६ वाजता आरती, तीर्थप्रसाद, ग्रामस्थांचे स्थानिक भजन, ७ वाजता हळदीकुंकू समारंभ, रात्री ९.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १० वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ, १०.३० वाजता ओमकार दशावतार नाट्यमंडळ म्हापण वेंगुर्ले यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक ग्रामपंचायत बिळवस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा