You are currently viewing मातोंड येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मातोंड येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

लायन्स क्लब, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, श्री. देवी सातेरी कला क्रीडा मंडळातर्फे आयोजन

वेंगुर्ला

लायन्स क्लब सावंतवाडी, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,शाखा -वेंगुर्ला व श्री. देवी सातेरी कला क्रीडा मंडळ मातोंड यांच्या संयुक्त विद्यमाने मातोंड येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ला. अमेय पै यांनी रक्तदान करून एक नवा आदर्श ठेवला. यावेळी ला. अध्यक्ष अशोक देसाई, सचिव ला. अ‍ॅड. परिमल नाईक, ला. विद्याधर तावडे, ला. संतोष चोडणकर, ला. संदेश परब, ला. यतीन तावडे ला. गजानन नाईक, ला. बाळ बोर्डेकर तसेच सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रकाश तेंडोलकर तसेच सातेरी कला क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, ग्रामस्थ व रक्त दाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातोंड पंचक्रोशी परिसरात प्रथमच रक्तदान शिबीर आयोजित केल्या बद्दल उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =