You are currently viewing उद्या २३ मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

उद्या २३ मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

कणकवली :

कणकवली येथील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली कार्यालयच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवार २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या नूतन कार्यालयाची सुसज्ज इमारत हळवल येथे रेल्वे फाटकानजिक बांधण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या देखरेखीखाली अत्यंत दर्जेदार बांधकाम असलेली सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. या उद्घाटन प्रसंगी खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यावेळी आमदार ॲड निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर आमदार नीलेश राणे यांच्यासह मुख्य अभियंता शरद भोज, जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.

या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता कमलिनी प्रभू, कनिष्ठ अभियंता संजीवनी थोरात यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा