*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माय कविता*
भान पल्लवीत करी
मनी अक्षरांचे रान
काव्य गोडावा पेरते
माय कविता महान
आपलेसे सर्वजणा
करीतसे काव्यातून
पानांवर मांडताना
जाते भान हरवून
लिहायला वाचायला
सोपी सरळ वाटते
मोह सोडवेना कधी
कर्ण मधूर करते
सहजता मधुरता
कवितेच्या अक्षरात
भावनांची आभूषणे
वाचकांच्या नयनात
वाचकांच्या मनामध्ये
पक्के केले हिने स्थान
म्हणूनच तर आहे
माय कविता महान
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक