You are currently viewing वैभववाडीत कोरोनाचे नवे आठ रुग्ण

वैभववाडीत कोरोनाचे नवे आठ रुग्ण

रुग्णांची संख्या ७२ वर; संख्या वाढत असल्यामुळे नागरीकांत चिंता

वैभववाडी प्रतिनिधी :-

देशात कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा अधिकच उद्रेक पाहायला मिळत आहे. वैभववाडी शहरात शुक्रवारी आणखी ८ रुग्णांची भर पडली आहे. हे सर्व रुग्ण स्थानिक रहीवाशी आहेत. तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७२ वर पोहोचली आहे. यातील ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तालुक्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.शुक्रवारी एडगाव येथील दोन व्यक्ती कोरोना पाॕझिटीव्ह आल्या आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे त्यांचे स्वॕब घेण्यात आले होते. तर कोरोना पाॕझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील तीन व्यक्ती कोरोना पाॕझिटीव्ह आढळल्या आहेत. तसेच वैभववाडी शहरातील एका कुटुंबातील दोन व्यक्ती पाॕझिटीव्ह झाल्या आहेत. हे सर्व स्थानिक रहीवाशी असल्यामुळे स्थानिकांमधील वाढत्या पादुर्भावामुळे सर्वञ भितीचे वातावरण पसरले आहे.

आतापर्यंत ४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर सध्या ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तर कोरोनामुळे तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेले दहा दिवस संपूर्णडा वैभववाडी बाजारपेठ प्रशासनाने बंद ठेवली आहे.अनलाॕकची प्रक्रीया सुरु झाली असली तरी नागरीकांनी आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी.कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन स्वतः बरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.असे आवाहन तालुका वैदयकीय अधिकारी डाॕ.उमेश पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − ten =