You are currently viewing रास्त भाव धान्य दुकानातून लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यंत धान्य उचल करण्याचे आवाहन

रास्त भाव धान्य दुकानातून लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यंत धान्य उचल करण्याचे आवाहन

रास्त भाव धान्य दुकानातून लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यंत धान्य उचल करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्त भाव धान्य दुकानातून धान्य वाटप करण्यात येते. तरी सर्व कार्डधारकांनी दरमहा 20 तारखेपर्यंत धान्य उचल करावी व सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांनी विहित वेळेते धान्याचे वाटप करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई यांनी केले आहे.

प्रत्येक महिन्याच्या 07 तारखेला ‘अन्नदिन’ व 14 तारखेला ‘अन्नसप्ताह’ साजरा करणे व या पंधरा दिवसांत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना धान्य वाटप करणे अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांनी धान्य घेण्यासाठी महिनाअखेर न थांबता, दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत धान्याची उचल पूर्ण करावी. रास्त भाव धान्य दुकानदारांनी या कालावधीत दुकाने चालू राहतील, कोणताही लाभार्थी दुकानातून परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी. संबंधित कार्ड धारकाने काही समस्या उ‌द्भवल्यास, संबंधित तहसीलदार कार्यालयाशी संपर्क करावा.

या व्यतिरिक्त सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाभार्थी संख्या 6 लखा 58 हजार 330 इतकी असून त्यापैकी आतापर्यंत 4 लाख 32 हजार 725 लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. अद्याप 34.27 टक्के म्हणजेच 2 लाख 25 हजार 605 लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याचे काम शिल्लक आहे. लाभार्थ्यांनी तात्काळ रास्त भाव दुकानाशी संपर्क साधून किंवा मोबाईल अॅप‌द्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा