द्रवनत्र वाहतुकीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या अनिधनस्त असलेल्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, कणकवली या कार्यालयाकडून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना महिन्यातून एकदा द्रवनत्र रेतमात्रा इत्यादीची पुरवठा वाहतूक करण्यासाठी एक वर्षाचा भावबंद करार कालावधीसाठी खासगी वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी दि. 20 मार्च 2025 पर्यंत मोहोरबंद लिफाफ्यात दरपत्रके सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय सिंधुदुर्ग येथे दि. 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता नियुक्त समिती समोर दरपत्रके उघडण्यात येतील व वाहतुकीचा कमीत कमी दर नमूद केलेल्या पुरवठादार यांना पुरवठा आदेश देण्यात येतील.
कामाचे नाव, तपशील, वाहनाचा प्रकार व क्षमता पुढीलप्रमाणे, जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र कणकवली सिंधुदुर्ग व जिल्ह्यातील इतर पशुवैद्यकीय संस्थांना लागणारे द्रवनत्र तसेच पुणे येथून विर्यमात्रा उचल व इतर वाहतुकीची अनुषंगिक कामे. मासिक फिरती अंदाजे 1800 ते 1900 किमी, T.A.55आकाराची 20-25 द्रवनत्र पात्रे बसतील अशा क्षमतेचे वाहन किंवा तत्सम प्रकाराचे.
अटी पुढीलप्रमाणे :- दरपत्रके सादर करताना अधिकृत लेटर हेड वरच सादर करावेत. दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात सादर करावे. दरपत्रके 10 दिवसांच्या आत सादर करावे. दर सर्व करासहित असावेत. GST प्रमाणपत्र दरपत्रकासोबत सादर करावे. वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे, आधार कार्ड, PAN कार्डसोबत सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02362-228808 ईमेल आडी ddcahsindhudurg@gmail.com वर संपर्क करावा. याबाबतचा तपशील कार्यालयाच्या तांत्रिक शाखेत उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.