परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना (मुला-मुलीना) दर वर्षी परदेशामध्ये अध्ययनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रक्रीया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी अद्ययावत (Qx World University Ranking) 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी 30 टक्के जागावर मुलीची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ताज्या घडमोडी या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. परिपूर्ण भरलेले अर्ज https://fs.maharashtra.gov.in या वेबसाइटवर वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमून्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास दिनांक 30 एप्रिल 2025 अखेर अर्ज सादर करावे.
या योजनेसाठी पात्र असण्याऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्तळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी संकेतस्तळास भेट द्यावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र.०२३६२-२२८८८२ येथे संपर्क साधावा.