You are currently viewing नंतर सुशांत प्रकरणी आंदोलन करावं : सतीश सावंत

नंतर सुशांत प्रकरणी आंदोलन करावं : सतीश सावंत

कणकवली:

जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केला. सुशांत प्रकरणावर बोलणारे आमदार नितेश राणे अंकुश राणे मृत्यूप्रकरणी का बोलत नाहीत? असा सवाल सतीश सावंत यांनी उपस्थित केला. नंतर सुशांत प्रकरणी आंदोलन करावं.आ. नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात कोणता विकास केला हे दाखवून द्यावे.मतदार संघातील विकास ठप्प आहे.देवगड तालुक्यात विकासकामांची साधी एक वीटही नाही लागली. राणेंच्या वक्तव्याची दखल शिवसैनिकांनी घेऊ नये असे वरिष्ठांचे आदेश आहेत.त्यामुळे राणे काय बोलतात याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांचे काम उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्गार सतिश सावंत यांनी काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =