शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकऱ्यांचा १२ मार्च रोजी धडक मोर्चा
सावंतवाडी
शेती, शेतकरी आणि निसर्ग यांना उध्वस्त करणारा, कंत्राटदार धार्जिणा नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाने बाधित राज्यातील १२ जिल्ह्यांतील शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांचा महाराष्ट्र विधानसभेवर धडक मोर्चा बुधवार दि.१२ मार्च रोजी आझाद मैदान, मुंबई येथून सकाळी ९ वाजता जाणार आहे. आपल्या जमिनीसाठी, आपल्या हक्कांसाठी आणि अस्मितेसाठी हजारोंच्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
