You are currently viewing समाज आणि संस्कृतीचे शुद्धीकरण साहित्यिकांनी करावे – विचारवंत श्रीपाल सबनीस.

समाज आणि संस्कृतीचे शुद्धीकरण साहित्यिकांनी करावे – विचारवंत श्रीपाल सबनीस.

समाज आणि संस्कृतीचे शुद्धीकरण साहित्यिकांनी करावे – विचारवंत श्रीपाल सबनीस.

पुणे

साहित्य सम्राट पुणे या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या बहुभाषिक द्विशतकी साहित्य संमेलनामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष थोर विचारवंत श्रीपाद सबनीस बोलत होते.
कै. रामचंद्र बनकर इंग्लिश स्कूल गंगानगर हडपसर येथे आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन संपन्न झाले. मंचावर संमेलनाचे उद्घाटक मा. प्रशांतदादा जगताप , वैशालीताई बनकर, सुनील बनकर, संमेनाध्यक्ष रतनला सोनग्रा, स्वागताध्यक्ष विनोद अष्टुळ, विशेष अतिथी – श्रीपाल सबनीस, प्रमुख पाहुणे- म.भा.चव्हाण, बबन पोतदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी सबनीस पुढे म्हणत होती की आज राजकारण अर्थकारण आणि धर्मकारण दूषित झाले आहे. साहित्यिकांनी राजकारण्यांना सडेतोड विचारण्याची भूमिका, सबंध संस्कृतीचे शुद्धीकरण, समाजाचे शुद्धीकरण करण्याची, नैतिकतेची भूमिका, सत्याची, माणुसकीची भूमिका, आणि अन्याया विरुद्ध लढण्याची भूमिका साहित्यिकांची असली पाहिजे. महापुरुषांनी सत्याचे जागरण आणि समाजाचे प्रबोधन केले तीच परंपरा आणि वारसा विनोद अष्टुळ साहित्य सम्राटच्या माध्यमातून ऐतिहासिक भूमिका पार पाडत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आज स्वारगेट बलात्कार सारख्या घटनेवरसुद्धा असंवेदनशील भाषा ऐकायला येते त्यासाठी साहित्यिकांनी कथा कविता कादंबरी यातून सत्यनिष्ठ विचार लिहिले पाहिजे. मानवता आणि सत्यशोधक ध्येयवादाला अर्पण करणारा हा अष्टुळ यांचा साहित्यसम्राट मंच आहे. त्यामुळे महापुरुष आणि संतांचे हे जीवित कार्य आहे.
संमेलनाची सुरुवात ढोल लेझीम आणि पारंपारिक वाद्यांच्या संगतीत ग्रंथ दिंडी जल्लोषात निघाली. विद्यार्थ्यांच्या मंचावरील भव्य सांस्कृतिक कार्यक्रमानंतर संविधान ग्रंथाची पूजा, संविधान गीत आणि उद्देशिका वाचून करण्यात आले. नंतर द्विशतकी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
विनोद अष्टुळ त्यांना कलाजीवन बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्यातर्फे डॉ.अलका नाईक मुंबई यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला.
समाजात नाविन्यपूर्ण कार्य करून समाजात ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना साहित्यसम्राट चे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडले. त्यामध्ये प्रा. अशोक शिंदे यांनी ‘ पाटलानं इटीला पळवलं ’ एकपात्री विनोदी कथा तर पोतदार यांनी ‘ बकू मावशी ’ ही हृदय स्पर्शी कथा ऐकून रसिकांना मंत्रमुक्त केले.
उत्कृष्ट जेवणाचा आनंद घेतल्यानंतर शेवटच्या सत्रात बहुभाषिक सुप्रसिद्ध कवींच्या मराठी हिंदी इंग्रजी कवितांनी अविस्मरणीय असे दोनशे वे राज्यस्तरीय कवी संमेलन अति उत्साहात बहारदार कवितांनी संपले. या कवी संमेलनामध्ये दिग्गज कवी बा.ह.मगदूम, प्रवीण खोलंबे, महेंद्र माणिक, सुरेश लोखंडे, सारिका सोमजे, शिवाजी उराडे, डॉ. अनिता जठार, ऐश्वर्या डगावकर इंदोर, सदानंद माळी सांगली, शौकत मुलांनी बार्शी, सुभा लोंढे, लक्ष्मण शिंदे भोर, इंदिरा पूनावाला, विद्या सराफ, अलका नाईक मुंबई, माणिकराव गोडसे, राहुल भोसले,गोरख पालवे, निरंजन ठणठणकर, दशरथ दोन भाऊ, नंदकिशोर ठोंबरे नाशिक, वैशाली शितोळे दौंड, श्रुतेश पाटील बालकवी, बबन सूर्यवंशी, डॉ.पांडुरंग बाणकेले, विजय सातपुते, जयश्री नांदे, गीता लंघे अशा, नव्वद कवी कवियत्री आपल्या आशयघन कवितांनी सभागृहाची मने जिंकली. वेळेअभावी अनेक स्थानिक मान्यवर कवींचे काव्यवाचन राहिले. सर्व कवी कवयित्रींना आकर्षक सन्मानचिन्ह आणि दोन द्विशतकी संमेलनाची स्मरणिका देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू पवार, कांचन मून, कविता काळे, बाळासाहेब गिरी यांनी तर आभार नानाभाऊ माळी व प्रा.बाबासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा