रज्जाक बटवाले यांनी आपली संघटनात्मक योग्यता तपासावी

रज्जाक बटवाले यांनी आपली संघटनात्मक योग्यता तपासावी

नंतरच त्यांनी जिल्हाध्यक्षाच्या विरोधात टिका करावी

रज्जाक बटवाले स्वयंघोषित अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष ज्या कालावधीत होते त्या संघटनात्मक कामाचा लेखाजोख्याचा हिशोब द्यावा तसेच आपली संघटनात्मक योग्यता तपासावी नंतरच बेसिक जिल्हाध्यक्षाच्या विरोधात टिका करावी. असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष सागर वारंग यांनी म्हटले आहे.

गेल्या एकवर्षा पासुन जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनात्मक काम चांगले सुरू आहे. जिल्हा कार्यकारिणी व जिल्हाध्यक्ष यांच्या समन्वयाने संघटनेचे कार्य सुरू आहे.त्याची दखल स्थानिक वृत्तपञ तसेच प्रदेशचे नेते घेत आहेत.ग्रामपंचायत निवडणूका पूर्वीचा व निवडणूक झाल्यानंतरचे दोन्ही सविस्तर अहवाल प्रदेश पातळीवर देण्यात आले आहेत.असे असताना पक्षाचा सामान्य सभासद नसलेला असंतुष्ट स्वयंघोषित माजी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष म्हणून बिरुदावली लावून प्रसिद्धीच्या झोतात रहाणारा बटवाले विद्यमान जिल्हाध्यक्षावर बिनकामाचे म्हणून आरोप करताना जराही काही वाटले नाही. गेल्या सहा सात महिन्यात किती लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला हे पञकार मिञांकडून जरी माहिती घेतली असती तर असली बाष्कळ बडबड केली नसती.ग्रामपंचायत निवडणूकांसाठी बैठका घेतल्या की नाही हे विचारण्याचा अधिकार फक्त पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आहे.तो अधिकार पक्षाचे सामन्य सुद्धा सदस्य नसलेल्या बटवालेला नाही.पण तेवढे तरी शहाणपणाचे ज्ञान जवळ हवे ना.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत जिल्हाध्यक्षानी काय भूमिका घेतली ते फक्त जिल्हा कार्यकारिणीच सांगू शकते.ते बटवालेचे काम नाही. माणुस असंतुष्ट असला की काही तरी उपद्व्याप हे सुचतच असतात त्यातलाच हा प्रकार आहे.संजय गांधी समिती जिल्हाध्यक्षानी दिली नाही.तसेच स्वयंघोषित अल्प संख्याक जिल्हाध्यक्ष पदाची भांडाफोड प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर केली ह्या उद्वेगातूनच जिल्हाध्यक्षावर बिनबुडाचे आरोप करून आपली प्रतिमा स्वच्छ आहे हे दाखविण्यासाठी केवळ निरर्थक धडपड आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ तसेच पवार साहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन काम करता म्हणून सांगता.मग कणकवलीत किती ग्रामपंचायती लढवल्या किती सदस्य निवडून आणले. कणकवली तालुक्यात संघटनेची अवस्था एक वर्षांपूर्वी कशी होती यावर बोला बटवाले.
आता शेवटी एकच सुचवितो की आपण वृत्तपञातून जी बातमी दिली त्या नुसार जिल्हाध्यक्षआपल्याला विश्वासात घेत नाहीत. कारण आपण पक्षाचे प्राथमिक सदस्य सुद्धा नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तेव्हा यापुढे जिल्हाध्यक्षाच्या किंवा पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर बोलण्या अगोदर आपली कार्यक्षमता किती याचा विचार करून बोलावे.असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली युवक तालुका अध्यक्ष सागर वारंग यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा